कागद आणि कात्रीचा वाद झाला एकदा.
कात्री खूप चिडली... तुला कापून काढीन म्हणाली...
कागद दुखावला. घडी करून बसला.
कात्री अजूनच कावली. कागदाला कराकरा चावली. शेवटी स्वतःच दमली. बाजूला जाऊन बसली.
कागद मग उघडला. कात्रीजवळ गेला...
आणि म्हणाला, "नक्षीबद्दल धन्यवाद!"
-समृद्धी