Saturday, August 23, 2014

एक भेट: काळ

तो: काय लिहितेयस?
मी: तू कोण?
तो: सांग ना... काय लिहिणार आहेस?
मी: प्रश्न बदलू नकोस... तू कोण? आणि प्लीज disturb करू नकोस... मी काहितरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न  करतेय...
तो: कशावर?
मी: तुला काय करायचंय?
तो: सांगशील?
मी: काळावर...
तो: माझ्यावर?
मी: तू काळ आहेस?
तो: yup
मी: OK... it's official... either मी desperate झाले आहे किंवा वेडी.
तो: It can't be official if there is an "or" in it...
मी: तुला माहितेय, तू ब-यापैकी त्रासदायक आहेस?
तो: सांगशील?
मी: मला काही सुचत नाहिय.. म्हणून गाण्याकडे वळले तर फक्‍त दोन आठवली... 'काळ देहासी आला खाऊ', आणि 'कशी काळनागिणी'...  विचार करतेय त्याचा काही उपयोग करता येतोय का ते...
तो: That's a wrong interpretation.
मी: काय?
तो: मरण, यम, म्रुत्यू म्हणजे काळ... माझ्या नावाचा उपयोग केलाय... पण अंत म्हणजे मी नाही.
मी: म्हणजे मी तुझ्याबद्दल चांगलं लिहावं असं तुला वाटतं. सगळीकडे शांतता आहे, सुखसम्रुद्धी असा सुकाळ मी दाखवू.
तो: पुन्हा चूक. काही वाईट घडलं नाही तर सुकाळ आणि वाईट घडलं तर दु्ष्काळ ही तुमची terminology. खरं तर वाईट किंवा चांगली परिस्थिती असते. I am pretty stable.. and neutral... and inert... and...
मी: All right... huh! मला काही सुचत नाहिय.
तो: विचार कर... तुला काय वाटतं माझ्याबद्दल?
मी: तू irritating आहेस.
तो: नाहीsssss.... म्हणजे मी 'काय' आहे? 'कसा' आहे?
मी: हं..... मला वाटतं की तू ब-यापैकी स्वार्थी आणि दुष्ट आहेस.
तो: बरं... का?
मी: तू कोणासाठी थांबत नाहीस. तू तुला हवं तसं बदलतोस. त्यानुसार आम्हाला बदलायला भाग पाडतोस. तुझे ठसे सगळीकडे उमटवून जातोस आणि आम्हाल तुझ्या तालावर नाचवतोस. मला तुझी ही दादागिरी पटत नाही आवडत नाही.
तो: Whoa!!!!  That's harsh.
मी: काय चुकीचं बोलले मी?
तो: हं... well...
मी: तुला काय वाटतं? तू काय आहेस? जर मी चूक आहे किंवा biased आहे असं तुझं मत असेल... तर मग मी आता तुला तीन संधी देते. मला समजावून सांग, काळ म्हणजे काय... and we will go from there...
तो: ठीक आहे... उत्पत्ती स्थिती लय.
मी: ????????
तो: तुमचे ब्रह्मा विष्णू महेश. आदिपासून अंतापर्यंतच अंतर म्हणजे मी.
मी: Not helping. तू मला व्याख्या देऊ नकोस. मला लिहायचं आहे. Definitions don't help.
तो: हं.... दुसरी संधी... ऋतूचक्र? लोकांनी काळ ही संकल्पना आणली ती सूर्य उगवतो आणि मावळतो -----
मी: Nope. नाही.... तू जा रे...  तुला काही जमत नाहिय.  तुझ्याकडे फक्‍त एक संधी उरली आहे..  आणि मला वेळ नाहीय.
तो: Yeah. She is always like that.
मी: She?
तो: वेळ... माझी Girlfriend. सतत late होत असते ती. तुम्ही म्हणता ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अर्थात यातही माझं interpretation चुकीचंच केलं आहे. किंवा Let's say different.
मी: विषयाकडे येऊया?
तो: हो. हं... ते Beatlesचं चालतानाचं poster माहितेय?
मी: हो...
तो: काय वाटतं बघून? पटकन काय डोक्यात येतं? Caption म्हणून?
मी: Journey of life? आयुष्य एक प्रवास!
तो: Good! Hold that thought.
मी: हं.
तो: आता.... कधी Trekking केलंयस?
मी: हो.
तो: पहिला Trek सांग आणि कधी गेली होतीस तेही सांग.
मी: लोहगड. मळवलीपासून चालवलं होतं आम्हाला.
तो: बरं... आता कल्पना कर.... मळवलीपासून विंचूटोकापर्यंत म्हणजे तुझं आयुष्य. आणि तू एकटी  चालतेयस.... मी सापडलो कुठेय?
मी: मी एकटी चालतेय....!
तो: ओह! अगं त्या Beatles च्या पोस्टरजागी हे चित्र बघ... आता मी दिसलो?
मी: तू रस्ता आहेस...? मी तुला मागे टाकत चाललेय?
तो: रस्ता तुझं आयुष्य आहे.... सगळे खड्डे, खाचखळगे, चढउतार हे तुझे अनुभव आहेत. तू तुझा रस्ता  शोधतेस... तू तुझं आयुष्य निवडतेस.
मी: मग... तू..... माझी.... सावली आहेस?
तो: सावली तुझा स्वत:वरचा विश्वास आहे. कधी पुढे... कधी मागे... आशेच्या किरणांनुसार बदलणारा. अंधार झाला की नाहिसा होणारा... उजेड दिसला की पुन्हा दिसणारा.
मी: .... मला कळत नाहिये....
तो: You know you have pretty average intelligence....
मी: and you know you are not changing my mind about you...
तो: OK...... sorry. मी तुझ्या बुटाचं सोल आहे.
मी: काय?
तो: मी तुझ्या शरीराचा भाग नसलो तरी मळवलीपासून विंचूटोकापर्यंत मी सतत तुझ्या बरोबर आहे. प्रत्येक पावलागणिक तू मागे टाकतेस ते अंतर तुझं अनुभवलेलं आयुष्य आहे... गेलेली वेळ आहे. धावायला लागलीस, की आयुष्याचे टप्पे पटापट गाठतेस आणि वेळही पटकन निघून जाते. मी मात्र तुझ्याबरोबर राहतो.  खाचखळग्यांनुसार मी झिजतो, विरतो... त्यानुसार तुझ्या पावलांनाही माझी सवय होते आणि कधीकधी त्यांची रचनाही बदलते. तुझी चाल बदलते... कधी मण्दावते. अर्थात आयुष्याच्या अशा trekमधे विश्रांतीच्या जागा नसतात. तू थांबलीस की आयुष्य थांबतं... प्रवास संपतो.
मी: पण मी breaks घेतले होते trekमधे.
तो: Come onnnnnn.... I think I did a good job explaining now. तू मला आता पेचात टाकू नको.
मी: All right...!! Sorry. हो. I do think you did a pretty good job this time. मला तू थोडाफार कळला आहेस.... असं म्हणायला हरकत नाही.
तो: लक्षात ठेव... In a trek, you need both... a good 'sole' and a pure 'soul'. मग... ठरवलंस? काय लिहिणार  आहेस माझ्यावर?
मी: नाटकासारखं काहितरी करीन. आणि माझा पहिला संवाद तयार झालासुद्धा...
तो: काय?
मी: 'मैं समय हूं'... :)

- समृद्धी 

Tuesday, August 12, 2014

भूक

काल भारतात जाण्याची तारीख पक्की झाली, आणि ह्या वेळी भारतात काय काय करायचं ह्याचे मनसुबे सुरू झाले. शेवटचा trek करून जवळजवळ तीन वर्ष झाली हे लक्षात आलं, आणि ह्यावेळी एक तरी trek करूच अशी मनाची तयारी केलीनव-याशी गप्पा मारताना  एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. मजेची गोष्ट अशी की दोघांच्याही trekच्या अनुभवांमध्ये खाण्यापिण्याची आबाळ हा एक विषय समान दिसून आला
Collegeमध्ये असताना एका वर्षी आम्ही सागरगडाचा trek केला. निघताना आमच्या group leader ने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी दोन डबे घेतले होते. पण नेहमीप्रमाणे आम्हाला निघण्याला उशीर झाला आणि वाटेत प्रचंड traffic लागला. आम्ही आमचे पहिले डबे फस्त केले. रात्री सागरगडाच्या पायथ्याशी  पोहोचलो आणि  पुढचा प्रवास उद्या हे समजल्यावर  उद्या खायचं काय हा प्रश्न रात्रीच्या जेवणानंतर उपस्थित झालादुपारपर्यंत trek  आटपू आणि मग जवळच्या कुठल्यातरी खानावळीमध्ये जेवण उरकू असं ठरलं. गडाकडे वाटचाल सुरू झाली आणि आम्ही चक्क वाट चुकलो. तीन तासांचा प्रवास सहा-सात तासांचा झाला आणि आम्ही सारे भुकेने करवादलो. खाली उतरताना पुन्हा रस्ता चुकलो आणि पहाटे सहा वाजता गडाच्या पायथ्याशी असलेले आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी दुपारी तीन वाजता आलो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्री पुन्हा जेवण असा चौफेर आहार चोपणा-या मला ‘भुकेने कळवळणे' ह्या वाक्प्रचाराचा त्या दिवशी पूर्णंत: प्रत्यय आला. खूप शोधल्यावर समोर एकच Genreal stores दिसलं आणि तिथे pepsicola हा लहानपणी दुसरीत असताना खाल्लेला एक पदार्थं मिळाला. देवाशपथ सांगते, त्या pepsicolaची चव (अम्रुताची चव माहीत नसल्याने) इथल्या Coldstoneच्या Ice creamपेक्षाही कित्येक पटींनी सुखकारक होती.
आता पुन्हा जेव्हा त्या प्रसंगाची आठवण येते तेव्हा विचार करते, रस्ता चुकूनही आम्ही केवळ तीन तासात खाली उतरलो, ते खरं तर भुकेमुळे. खाली खायला मिळणार ह्या स्फू्र्तीमुळे माझ्या पायात त्यावेळी उसनं का होईना, पण बळ आलं होतं. भूक हा केवढा महत्त्वाचा driving force आहे ह्याची मग जाणीव झाली. विरहाशिवाय प्रेमाची किंमत जशी कळत नाही, तशी भुकेशिवाय अन्नाची किंमत कळत नाही. अर्धा दिवस उपास झाल्यावर पेप्सीकोल्यावर तुटून पडणारी मी, ‘Les Miserables’ ची कथा ज्याच्या पावाच्या चोरीमुळे घडली तो ज्यों व्हालज्यों, आणि मुंबईच्या लोकलमध्ये खाली पडलेला, मातीने माखलेला बिस्कीटचा तुकडा अधाशीपणे खाणारा एक भिकारी मुलगा. . . तसं पाहता आमची पार्श्वभूमी वेगळी, आमच्या क्रुतीमुळे घडणा-या गोष्टी वेगळ्या.. . पण आम्हाला तरीही एकाच समान धाग्यात बांधते ती भूक. “पापी पेट का सवाल है” असं म्हणत कोणी ह्या भुकेपायी चो-यामा-याही करतं, तर कोणी देहविक्रयात फसतं. शरीराची भूक भागवण्याच्या नादात मग कोणी म्रुत्यूच्या दारात घेऊन जाणारा रोग जडवून घेतं तर कोणी दुस-याचं आयु्ष्य उद्ध्वस्त करून टाकतं. लहान बाळाला आईसाठी आकांत करायला भाग पाडणारीही ही भूकच आणि स्वत: च्याच पिलांना जन्मल्याबरोबर संपवण्यास भाग करणारी ही भूकच.  
खरं तर, Freudच्या theory नुसार Id मध्ये बसणारी ही भूक. पण आपल्याकडे भुकेला आपण विविध रूपे देतो. एखा्द्या गोष्टीची तीव्र इच्छा, निकड, ओढ यालाही आपण भुकेच्या स्वरूपात मांडतो. संत साहित्यात अनेकदा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीची तुलना लहान बाळाच्या भुकेशी केली आहे.
“भुकेलेया बाळा अती शोक करी, वाट पाहे परी माऊलीची;
तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा."
कलेची भूक असणारे एखादे भीमसेन मग धुणीभांडी करत वर्षं काढतात.. . ज्ञानाची भूक असणारे एखादे आंबेडकर हलाखीच्या परिस्थितीतून महत्त्वाला पोहोचतात.


असो. . . तर आज संध्याकाळी कामावरून घरी आले.. . आणि भूक लागली. बाहेर जेवायला जायचं ठरवलं आणि मनसोक्‍तं Thai जेवण चापलं. शेवटचा उरलेला थोडासा भात.. .” माझं पोट भरलंय रे..” असं म्हणून नव-याला खायला लावला. बाहेर आल्यावर मात्र जरा त्या Baskin and Robin पर्यंत जाउया का असं म्हटलं, तेव्हा नवरा म्हणतो. . . “तुझं पोट भरलं होतं ना?” मी म्हटलं,” पोटाची भूक आणि Ice cream ची भूक ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. . .” तुम्हाला काय वाटतं?