Tuesday, August 12, 2014

भूक

काल भारतात जाण्याची तारीख पक्की झाली, आणि ह्या वेळी भारतात काय काय करायचं ह्याचे मनसुबे सुरू झाले. शेवटचा trek करून जवळजवळ तीन वर्ष झाली हे लक्षात आलं, आणि ह्यावेळी एक तरी trek करूच अशी मनाची तयारी केलीनव-याशी गप्पा मारताना  एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. मजेची गोष्ट अशी की दोघांच्याही trekच्या अनुभवांमध्ये खाण्यापिण्याची आबाळ हा एक विषय समान दिसून आला
Collegeमध्ये असताना एका वर्षी आम्ही सागरगडाचा trek केला. निघताना आमच्या group leader ने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी दोन डबे घेतले होते. पण नेहमीप्रमाणे आम्हाला निघण्याला उशीर झाला आणि वाटेत प्रचंड traffic लागला. आम्ही आमचे पहिले डबे फस्त केले. रात्री सागरगडाच्या पायथ्याशी  पोहोचलो आणि  पुढचा प्रवास उद्या हे समजल्यावर  उद्या खायचं काय हा प्रश्न रात्रीच्या जेवणानंतर उपस्थित झालादुपारपर्यंत trek  आटपू आणि मग जवळच्या कुठल्यातरी खानावळीमध्ये जेवण उरकू असं ठरलं. गडाकडे वाटचाल सुरू झाली आणि आम्ही चक्क वाट चुकलो. तीन तासांचा प्रवास सहा-सात तासांचा झाला आणि आम्ही सारे भुकेने करवादलो. खाली उतरताना पुन्हा रस्ता चुकलो आणि पहाटे सहा वाजता गडाच्या पायथ्याशी असलेले आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी दुपारी तीन वाजता आलो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्री पुन्हा जेवण असा चौफेर आहार चोपणा-या मला ‘भुकेने कळवळणे' ह्या वाक्प्रचाराचा त्या दिवशी पूर्णंत: प्रत्यय आला. खूप शोधल्यावर समोर एकच Genreal stores दिसलं आणि तिथे pepsicola हा लहानपणी दुसरीत असताना खाल्लेला एक पदार्थं मिळाला. देवाशपथ सांगते, त्या pepsicolaची चव (अम्रुताची चव माहीत नसल्याने) इथल्या Coldstoneच्या Ice creamपेक्षाही कित्येक पटींनी सुखकारक होती.
आता पुन्हा जेव्हा त्या प्रसंगाची आठवण येते तेव्हा विचार करते, रस्ता चुकूनही आम्ही केवळ तीन तासात खाली उतरलो, ते खरं तर भुकेमुळे. खाली खायला मिळणार ह्या स्फू्र्तीमुळे माझ्या पायात त्यावेळी उसनं का होईना, पण बळ आलं होतं. भूक हा केवढा महत्त्वाचा driving force आहे ह्याची मग जाणीव झाली. विरहाशिवाय प्रेमाची किंमत जशी कळत नाही, तशी भुकेशिवाय अन्नाची किंमत कळत नाही. अर्धा दिवस उपास झाल्यावर पेप्सीकोल्यावर तुटून पडणारी मी, ‘Les Miserables’ ची कथा ज्याच्या पावाच्या चोरीमुळे घडली तो ज्यों व्हालज्यों, आणि मुंबईच्या लोकलमध्ये खाली पडलेला, मातीने माखलेला बिस्कीटचा तुकडा अधाशीपणे खाणारा एक भिकारी मुलगा. . . तसं पाहता आमची पार्श्वभूमी वेगळी, आमच्या क्रुतीमुळे घडणा-या गोष्टी वेगळ्या.. . पण आम्हाला तरीही एकाच समान धाग्यात बांधते ती भूक. “पापी पेट का सवाल है” असं म्हणत कोणी ह्या भुकेपायी चो-यामा-याही करतं, तर कोणी देहविक्रयात फसतं. शरीराची भूक भागवण्याच्या नादात मग कोणी म्रुत्यूच्या दारात घेऊन जाणारा रोग जडवून घेतं तर कोणी दुस-याचं आयु्ष्य उद्ध्वस्त करून टाकतं. लहान बाळाला आईसाठी आकांत करायला भाग पाडणारीही ही भूकच आणि स्वत: च्याच पिलांना जन्मल्याबरोबर संपवण्यास भाग करणारी ही भूकच.  
खरं तर, Freudच्या theory नुसार Id मध्ये बसणारी ही भूक. पण आपल्याकडे भुकेला आपण विविध रूपे देतो. एखा्द्या गोष्टीची तीव्र इच्छा, निकड, ओढ यालाही आपण भुकेच्या स्वरूपात मांडतो. संत साहित्यात अनेकदा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीची तुलना लहान बाळाच्या भुकेशी केली आहे.
“भुकेलेया बाळा अती शोक करी, वाट पाहे परी माऊलीची;
तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा."
कलेची भूक असणारे एखादे भीमसेन मग धुणीभांडी करत वर्षं काढतात.. . ज्ञानाची भूक असणारे एखादे आंबेडकर हलाखीच्या परिस्थितीतून महत्त्वाला पोहोचतात.


असो. . . तर आज संध्याकाळी कामावरून घरी आले.. . आणि भूक लागली. बाहेर जेवायला जायचं ठरवलं आणि मनसोक्‍तं Thai जेवण चापलं. शेवटचा उरलेला थोडासा भात.. .” माझं पोट भरलंय रे..” असं म्हणून नव-याला खायला लावला. बाहेर आल्यावर मात्र जरा त्या Baskin and Robin पर्यंत जाउया का असं म्हटलं, तेव्हा नवरा म्हणतो. . . “तुझं पोट भरलं होतं ना?” मी म्हटलं,” पोटाची भूक आणि Ice cream ची भूक ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. . .” तुम्हाला काय वाटतं?

2 comments:

  1. formatting मध्ये ब-याच चुका अाहेत, उदा. शब्द तुटले अाहेत (विशेषतः अोळीच्या शेवटी येणारे), otherwise, चांगला जमला अाहे :)

    ReplyDelete