निळ्याशार गाभ्यात लपलेली रहस्यं
बघता बघता मनाच्या कुपीत डोकावतात...
त्या निळाईत आकाश शोधत बसते,
आणि डोळ्यात दाटलेला वेडा थेंब अलगद गालावर उतरतो.
मनातल्या लाटा जणू क्षितीजापाशी विरून जातात...
निळाईची साद आभाळात भरून येते, तेव्हा वाटतं...
अंगात भरून घ्यावी ती गाज...!
किना-यावरच्या, पुसून गेलेल्या... नावांच्या खुणा...
स्वत:च्या एका बोटाने लिहीलेल्या.
खरं सांगू... चालता चालता वाळू कधी सरकत गेली... कळलंच नाही...
मग... किनारे बदलत गेले...
क्षितीज बदलत गेलं...
डोळ्यातली निळाई मात्र गडद होत गेली...
‘त्या’ची अथांगता कधीतरी वेडावून गेली,
गाभ्यातली रहस्यं अंतरंगात विसावली.
आता... फक्त स्वत:शीच संवाद...
प्रश्न...
उत्तर...
सहवास...
प्रवास...
- Samruddhi
- Samruddhi
कधी आतला संवाद कधी वेड पसार्याचे
ReplyDeleteकुणा उमजत नाही..मन उधाण वार्याचे..