Sunday, July 15, 2012

ओळख

"दोन क्षण... दोन क्षणात सगळं... सगळं जगच बदलून गेलं आमच्यासाठी... डोळे उघडले, तेव्हा Doctor म्हणाले," God is great! You are the only survivor!"... हं... survivor... really?"

"आयुष्यभर struggle केलेली मी... आधी आई्बाबांच्या छायेतून बाहेर येण्यासाठी... मग drugsच्या गर्तेतून स्वतःला सोडवण्यासाठी... Mike भेटला, तेव्हा struggle संपलं नाही, पण ते enjoy करायला लागले. Popping आणि locking करता करता soda-pop सारखं फसफसतं आयुष्य जगायला लागले. Mike म्हणायचा... "sexy lady, you are the next big thing on the 'streets'..." थोडा over-confident होता माझ्याबद्दल. But we were happy... समाधानी नाही, but happy. आणि तो big day... state level championship साठी आमचा crew घेऊन आम्ही चाललो होतो. It's Vegas baby...!! We were laughing, cheering... we were prepared... we were ready to take the world...!!! SHAWN... पुढे बघ...!!! -----------"

"I can't feel my feet no more... कमरेपासूनचा खालचा भाग... 'पांगळा' झालाय... Doctor म्हणाले... God is 'great'... I survived... Great!... माझ्या crewचे सगळे संपले... Great!... आमची championship चुकली... Great!... माझा mentor - friend - Mike is no more... Great!... मी wheelchair-bound झाले... Great!... yeah... God 'IS' great!"

"वर्ष झालं accident ला. काही काळाने wheelchair माझी friend, philosopher, guide, mentor झाली. सुरुवातीला आमचं पटत नव्हतं... सुरुवातीला माझं माझ्याशीच पटत नव्हतं... paraplegic शरीराला hip-hopper मन स्वीकारू शकत नव्हतं. जसा वेळ गेला, तसं वजन वाढत गेलं. सुबकची बेढब झाले. Support group मधून स्वतःला थोडं थोडं सावरत wheelchairच्या साथीने एक 'disabled' म्हणून स्वतःची ओळख करुन घेतली. Happy होण्याचा प्रयत्न करु लागले... समाधानी नाही... पण happy...."

"आणि मग काही दिवसांपूर्वी Dina भेटली. Starbucks मधे Frappuccino घेताना. आजकाल Frappe is my new love... Lots of sugar and cream... satisfy me... well... Frappe देणा-या माणसासकट ८०% लोकांच्या नजरा अचानक दरवाज्याकडे वळल्या. आणि ती तिथे होती. Latina... such a head turner she was... तिच्याशी ओळख झाली... तिनेच करून घेतली. आवडली मला... Smart, धाडसी, independent आणि... sexy सुद्धा. She was engaged... was into modeling... wow!.... पाच वर्षांपूर्वी ताप आला आणि अचानक पायांतली शक्‍ती निघून गेली तिच्या... Transverse Myelitis... Wheelchair bound झाली तीसुद्धा. बोलता बोलता म्हणाली -
     "Depression मधून बाहेर पडले आणि जाणवलं, आता आपण वेगळे आहोत. लोकांच्या नजरा तशाही वळतातच... मग त्या नजरांमध्ये दया आणि उपेक्षेऐवजी, आश्चर्य आणि कुतुहल बघितलेलं जास्त आवडेल मला. Modeling करत होते आजाराआधी... आता rampवर नाही चालू शकले, तरी I still have my face... and it IS beautiful. माझ्या photographer मित्राला contact केलं, आणि advertisements च्या जगात प्रवेश केला. I am independent now... confident on my capacities. boyfriend सुद्धा ad agency मधलाच आहे. After all,
शक्‍ती फक्‍त माझ्या पायांतच नाहीय."..."

"अंतर्मुख झाले तिच्याशी बोलुन. Somehow... the world started making much more sense. दुस-याच दिवशी Gym join केलं. थोडा त्रास झाला... पण पुन्हा struggle चालु केलं परिस्थितिशी. आणि ह्यावेळी wheelchair च्या सोबतीने. Dina म्हणाली... अगदी तसंच... I might not have power in my legs... but I still got my moves... and they HAVE power. एक hip hop dancer हीच माझी ओळख आहे, आणि माझी disability माझी ही ओळख पुसून नाही टाकू शकत..."

(inspired by 'push girls')

- Samruddhi



Saturday, April 21, 2012

Never just yours

Your life is never just your life... It's almost always shared by the those who grow you up and those whom you grow up...

- Samruddhi 

Thought


Marte hain aarzoo mein marne ki, Maut aati hai par nahin aati
(“I die in the wish to die, the death comes… but doesn’t come”)
     - Mirza Ghalib

Sunday, April 15, 2012

RanCon 5: My personal cheerleader: Dani



"Hey, you look tired!"

"I am..."

"and terribly bored too..."

"yeah...."

"and lost....!!!"

"I have been working this whole day... and then the deadlines... and this computer is killing my eyes... and then this internet is soooo slow... this program just doesn't save my work..."

"woh.... calm down... you are a human... not a machine... not this program... not the computer! Let me give you a hug...."

"?"

"you need some human touch... MY touch... not i-touch!!! :)"


"....."

Thursday, July 21, 2011

Just something: Connections

So I completed 26 years of my life. And decided to visit my blog and start writing regularly now onward. Why? In a way I have many answers to it and in other way, I don't know exactly. One more thing... This is the first time ever that I started writing something without actually having any preconception of idea. I haven't thought anything. I don't know what I am going to write about. Just... writing... May be somewhere in my mind, I want to start the dialogue with myself which had stopped since I came here, in US.
My birthday... These days people wish very punctually. Thanks to social networking sites. So I checked my facebook wall... one old friend had wished me in 'Sanskrit'... smile on my face... naturally... he had been famous for his amazing eloquence in school days... respect him for that. Then I checked his profile... why? -  do not know... and then checked his recent activity... why? - do not know again. An interesting thing I see... In past few minutes, he had wished 5 of his friends for their birthdays... wow!!! Then I checked their profiles... why? - well.. I have an answer now... curiosity (wasn't this the answer for all my previous questions?...hmmm...). Then I come to know that all these people stayed in Dombivli (where I stayed), were born on the same day as I and were connected to me for all these years through this friend because he must have known them for years. Amazed! :)
Since I was reading neurology before writing this and thus, felt like being part of a big big neural structure... like.. I am a neuron and all those people (including one more american friend of mine) who were born on the same day are other neurons of this big brain of world which is in the formation stage - as in an infant brain. And as time passes, all the friends function as the glial structures which connect these neurons. Number of neurons remains the same but the glial cells increase and so the connections. The only complication or may be an advancement in this brain is that... here the neurons itself also function as glial cells... as in some other cases, even I may be functioning as the connection between few other people.
Alright... I know nothing that I wrote makes much sense. But at least there is some satisfaction that I began writing... which might make sense sometime...  For the rest of the day - I am just happy knowing 4 more people who were born the same day and stayed in the same good town where I was situated. All smiles.  :) 

Sunday, October 17, 2010

दर्शन : बरणी

दुकानातली आवडलेल्या पदार्थाची बरणी घरात येते.
 सगळ्यात आधी तिच्यावरचं label निघतं.
 मग तिच्यातला तो आवडलेला पदार्थ संपतो.
 त्यानंतर ती घासून पुसून स्वच्छ होते.
 आणि मग घरातला साठवणीचा पदार्थ तिच्यात भरला जातो.

अर्थात्, आता ती बरणी, 'घरातली' होते...
 
 - Samruddhi

Saturday, July 31, 2010

ek pravesh

 नवरसांवरती प्रयोजलेल्या एका एकांकिकेतील एक प्रवेश... रंगमंच पाहू न शकलेला...
पात्र परिचय: १. सामान्य माणूस       २. विदूषक

( स्टेजवर पूर्ण काळोख. २ सेकंद. विचित्र शांतता. अचानक आवाज चालू. प्रथम कुजबुज. त्याबरोबर  'माणसा'चा प्रवेश. काहीतरी शोधतोय. सापडत नाही. त्रस्त. अचानक आवाज वाढतात. आवाज...
blackच्या तिकिटांची विक्री... डबेवाल्यांचा आवाज... मोठ्याने हसणे... अचकट विचकट comments...' हमारी मांगे पूरी करो...'...हुज्जत घातल्याचा आवाज... ढोलकीचा आवाज... घंटा आणि झांजा... 'विठ्ठल विठ्ठल'... 'कांटा लगा.."... किंकाळी... मोठे हास्य.....
प्रत्येक वेळी चेह-यावरचे भाव बदलतात. आधी विमनस्क... येरझारा... शेवटी ओरडतो...)

माणूस: बास!! (कोसळतो... हताश होवून बसतो. शून्यात नजर. काहीतरी ठरवून उठणार इतक्यात...)

विदूषक: (विदूषकाचा प्रवेश माणसाच्या किंकाळीच्या वेळी. आवाजाने थबकतो. प्रेक्षकांकडे पाहून 'वेड लागलंय वाटतं'चे हावभाव. टिवल्याबावल्या करत माणसापर्यंत पोहोचतो. तो उठणार इतक्यात...) काय हो, तुम्ही दिवसाही स्वप्नं बघता का हो?

माणूस: (लक्ष देत नाही) चक्.....

विदूषक: अहो, मला तर रात्रीही व्यवस्थित स्वप्नं पडत नाहीत. असं म्हणतात, की जास्त स्वप्नं पडणारा माणूस सर्वात जास्त विचार करतो. आता बघा ना... यावरुन मला माझे सगळे मित्र बिनडोकंच म्हणायला लागले आहेत. एकजात सारे...

माणूस: (त्याच्या बडबडीने हैराण होत 'कुठून ही ब्याद' अशा आविर्भावात...) अहो, तुम्ही कोण... कुठले... हे मधूनच येऊन मला का हैराण करताय?

विदूषक: आत्ता!!!.... अहो अशा या रम्य संध्याकाळी, समुद्राच्या किनारी... एखादं गाणं...(आठवतं)... गाणं... 'सागर किनारे, दिल ये पुकारे, तू जो नही तो मेsss(आवाज चिरकतो... खाकरतो)...म्हणजे आपलं गाणं वगैरे म्हणायचं सोडून तुम्ही हे असे 'बास!' (ओरडतो, माणूस दचकतो) वगैरे आरोळ्या ठोकत होतात... म्हणून म्हटलं...जरा विचारपूस करूया. एखादं चांगलं horror स्वप्न वगैरे बघितलं असेल तर आम्हालाही कळू दे... आजकाल तसेही डझनभर भयपट आले तरी मी काही घाबरू शकलो नाही... म्हणजे त्या गोष्टीतली ती राजकन्या नाही का... काही केल्या हसतंच नसते... आणि मग ती कोंबडी...

माणूस: (त्याच्या या असंबद्ध बडबडीमुळे आणखीनच वैतागत) अहो गप्प बसा हो... आधीच जगातल्या या कोलाहलामुळे त्रस्त झालोय मी... निदान समुद्राच्या पोटात तरी शांतता मिळेल म्हणून इथे आलो तर.... तर इथेही तुम्ही...

विदूषक: म्हणजे... म्हणजे तुम्ही पोटात उडी(चूक लक्षात येते)... आपलं..पोटात पाणी... आपलं..समुद्रात आssत्म...हssत्याss करणार होतात?!!!
(माणूस बघतो. शांतपणे बघून मान खाली घालतो.) अहो पण का?

माणूस: हं, (विषण्णपणे हसतो) आता उरलंय काय या जगण्यात? जीवनातला सगळा रसंच संपून गेलाय माझ्या..

विदूषक: अहो पण मग दुस-यांना त्यासाठी कशाला त्रास देताय? (माणूस प्रश्नार्थक नजरेने पाहतो) म्हणजे बघा, तुम्ही तर बुडून मरणार; पण तुमचं प्रेत तसंच पाण्यावर तरंगणार; मग कुजणार... उगाच समुद्र किती खराब होईल हो त्यामुळे?!! मग बिचा-या माशांना किती त्रास होsss..

माणूस: किती क्रूर बोलताय तुम्ही...

विदूषक: (हसतो) मी..? अहो मी तर् जीवनाचा पुरेपूर आनंद घेतोय आणि तुम्हालाही घ्यायला सांगतोय... अहो तुमच्या जीवनातला रस संपलाय असं तुम्हाला वाटतं ना? मग एकवार इतरांकडे डोळे उघडून बघा... अहो केवढी रसपूर्ण आहे ही दुनिया! (माणूस गोंधळून बघतो) अहो हा सूर्यास्त पहा... ते तेजोमय बिंब सागरात विरताना पहा... एक दिव्यत्वाचा अनुभव नाही येत तुम्हाला यातून? ते स्वच्छंद फिरणारे पक्षी.. या धुंद लाटा... हे निसर्गसौंदर्य मनाला शांतता नाही देत तुमच्या? अहो एखादी नववधू जेव्हा लाजते... तेव्हा ती श्रुंगारिकता मोहवून नाही टाकत तुम्हाला?

माणूस: हं..(कुत्सितपणे) कसलं काय?

विदूषक: अरे... अहो या खून, दरोडे, मारामारी, बलात्कार यांचाच वैताग आलाय ना तुम्हाला... या जगातल्या खोटेपणाचाच त्रास होतोय ना तुम्हाला... अहो पण यातूनही कितीतरी गोष्टी शिकताच की तुम्ही... काय?...( माणसाकडे बघून) नाही शिकत?

माणूस: (चेह-यावरचे भाव बदलतात) ... याचा विचारच कसा केला नाही मी?

विदूषक: मी कशाला आहे मग... म्हणजे... येताय माझ्याबरोबर?

माणूस: कुठे?

विदूषक: मी बाबा कंटाळलोय या अंधाराला... चला जरा फेरफटका मारून येऊया... तुम्हाला माकझ्या दॄष्टीने आता दुनिया दाखवतो...
(सहज माणसाला उठवतो... स्टेजच्या मध्यभागी येतो... प्रकाशयोजनेचा खेळ...)

- Samruddhi
( January 2006)