Perceptions are not of things but of relationships.
Nothing, including me, exists by itself - this is an illusion of words.
I am a relationship, ever-expanding.
- Hugh Prather
(Notes to Myself)
Friday, May 7, 2010
Thursday, May 6, 2010
माझी वही : २. कविता...
खोटं कधी बोलू नये
खरं कुणाला सांगू नये
बुद्धीबळाच्या पटावर
शब्दकोडी सोडवू नये
कुणाकडे काही मागू नये
मागितल्याशिवाय देऊही नये
केलेच कुणावर उपकार तर
व्याजाची अपेक्षा करू नये
डोकं रिकामं ठेवू नये
विचारात गुंगून जाऊ नये
नाहीच उत्तरं मिळाली तर
नुसतंच रडत बसू नये
डाराडूर झोपू नये
सतत सावधही असू नये
स्वप्नपूर्ती होण्याची
अपेक्षा मात्र बाळगू नये
हाव कधी धरू नये
विरक्तही होवू नये
फुलपाखरं पकडण्याचा
अट्टाहास करू नये
बनवाबनवी करू नये
साधंसरळही असू नये
वळणावळणांच्या रस्त्यावर
वाटाड्यावर पूर्ण विसंबू नये
दिमाखदार दिसू नये
अजागळही असू नये
बहुरंगी या जगात
पण मेकअप् शिवाय फिरू नये
कौतुकात रमू नये
द्वेषात मोडून पडू नये
स्टेजवरच्या नाटकातला
रोल स्वत: जगू नये
निगरगट्ट राहू नये
भावनाविवश होवू नये
मनामधल्या अंतरांसाठी
मोजपट्टी शोधू नये
( नोव्हेंबर २००४)
- Samruddhi
खरं कुणाला सांगू नये
बुद्धीबळाच्या पटावर
शब्दकोडी सोडवू नये
कुणाकडे काही मागू नये
मागितल्याशिवाय देऊही नये
केलेच कुणावर उपकार तर
व्याजाची अपेक्षा करू नये
डोकं रिकामं ठेवू नये
विचारात गुंगून जाऊ नये
नाहीच उत्तरं मिळाली तर
नुसतंच रडत बसू नये
डाराडूर झोपू नये
सतत सावधही असू नये
स्वप्नपूर्ती होण्याची
अपेक्षा मात्र बाळगू नये
हाव कधी धरू नये
विरक्तही होवू नये
फुलपाखरं पकडण्याचा
अट्टाहास करू नये
बनवाबनवी करू नये
साधंसरळही असू नये
वळणावळणांच्या रस्त्यावर
वाटाड्यावर पूर्ण विसंबू नये
दिमाखदार दिसू नये
अजागळही असू नये
बहुरंगी या जगात
पण मेकअप् शिवाय फिरू नये
कौतुकात रमू नये
द्वेषात मोडून पडू नये
स्टेजवरच्या नाटकातला
रोल स्वत: जगू नये
निगरगट्ट राहू नये
भावनाविवश होवू नये
मनामधल्या अंतरांसाठी
मोजपट्टी शोधू नये
( नोव्हेंबर २००४)
- Samruddhi
Wednesday, May 5, 2010
माझी वही : १. तो... आणि पाऊस
तो...
त्याचा गंध... त्याची आस
हरवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
ऊनसरींचा खेळ करतं
हा पाऊस... वळवाचा
तो...
त्याचा स्पर्श... त्याची गाज
विसरते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
धो धो कोसळू लागतं
हा पाऊस... वादळाचा
तो...
त्याची चाहूल... पडलेली भूल
फसवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
संयम सुटून रडू लागतं
हा पाऊस... गारांचा
तो...
त्याचा श्वास... किरर्र आभास
भुलवतात माझे मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
अंधाराचा कडेलोट करतं
हा पाऊस... अस्तित्वाचा
एवढ्यात कुठेतरी किरण येतात,
इंद्रधनुष्याचे रंग भरतात,
मोहरुन टाकतात माझे मलाच!
आताही आभाळ दाटून येतं,
सोबत जीवन घेऊन येतं,
हा पाऊस... हर्षाचा...
हा पाऊस... जल्लोषाचा!!!
( एप्रिल २००४)
- Samruddhi
माझी वही....
काल कपाट आवरलं.... आणि एका कोप-यात माझी थोडी खिळखिळी झालेली वही सापडली... काही वर्षांपूर्वी मीच लिहिलेला ऐवज मिळाला... आणि मग blog खुणावू लागला...
मजा असते नाही... आपण कधी, काय, कशाला लिहितो... याचे संदर्भ नंतर आठवावे लागतात... आणि आपल्यालाच आपण नव्याने उमगू लागतो...
म्हणूनच आता वही blog वर आणतेय... त्या काळासहित...
माझी वही....
- Samruddhi
Thursday, April 15, 2010
RanCon 3: with Wookie
" Don't trust people so fast..."
" I believe them...."
" What's d difference between 'belief' and 'trust'?"
" Belief comes from within... its pure and innocent.... kids believe in a fairy and it exists for them...."
" And 'trust'?"
" Trust is an adult affair... its complicated... you invest trust... there are chances of getting hurt in it..."
".................................."
" Well, these meanings look good on paper.. In life, you can't define it simply. The whole essence is lost in translation into words..."
Wednesday, April 14, 2010
रहस्य
माझ्या भेटीनंतर तू नेहमीच अबोल होतेस....
अन् त्यामागचं रहस्य मला कधीच उलगडत नाही...
अवचित बरसणा-या सरीसारखी येतेस...
तुझ्या नुसत्या हसण्यानेच मी नव्याने fresh होतो...
तुझा हातात घेतलेला हात चट्कन सोडवतेस...
त्या निसटत्या स्पर्शाने मी मात्र नि:शब्द होतो...
Taxi मधली आपल्यातली नीरवता...
संवादाची ही कला तुला कोणी शिकवली?
अन् मग अचानक...
"मी तुझ्यात माझं आयुष्य नाही बघु शकत..." तू म्हणतेस....
"....... चल, तुला घरी सोडतो..." मी म्हणतो...
तू पुन्हा अबोलतेस....
रहस्यांची वलयं अधिकच गडद होत जातात...
आताशा मला छंद जडलाय....
त्या रहस्यांचा....
तुझा......!!
- Samruddhi
Monday, April 12, 2010
प्रश्न
तुझ्या भेटीनंतर मला बरेच प्रश्न पडतात...
अन् त्यांची उत्तरं तू कधीच देत नाहीस...
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, मला भेटताना तू नेहमीच fresh असतोस...
मी मात्र थकलेली, भेटीचे norms पाळत, हसते...
एकत्र चालताना अवचित हात हातात घेतोस...
मी चट्कन हात सोडवते...
तू फक्त नि:श्वास टाकतोस...
Taxi त शेजारी बसल्यावर मी काही बोलण्याची तू वाट बघतोस...
शब्द-स्पर्शापलिकडचा संवाद तुला कळतच नाही...
" मी तुझ्यात माझं आयुष्य नाही बघू शकत...", मी म्हणते...
" चल... तुला घरी सोडतो....", तू म्हणतोस...
"............................................."
तुझ्या भेटीनंतर मला बरेच प्रश्न पडतात....
अन् त्यांची उत्तरं...... तू...... कधीच....!?!
- Samruddhi
Subscribe to:
Posts (Atom)





